He Changed the life

December 31, 2020 0 Comments

२०२० ची सकाळ अजूनही आठवते.नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. दर वर्षीप्रमाणे यंदाही मी नवीन वर्षाचा संकल्प केला होता. त्या यादीमध्ये दरवर्षी प्रमाणे तंदुरुस्त राहण्यापासून ते करियर च्या दिशेने एक नवीन वाटचाल सुरू करण्याचा विचार मी केला होता. कॉलेजचे शेवटचे वर्ष आणि करियर ची चिंता. एके जागी जॉब साठी अप्लाय केले आणि सेलेक्ट ही झालो. जॉब सुरू होऊन अवघे १५ दिवस झाले असता, कानावर एक कधी न ऐकलेला शब्द ऐकू आला. ” कोरोना”. आधी दुर्लक्ष केलं त्यानतंर माहिती काढली असता कळाले की, हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. रोज लोकल ट्रेन च्या गर्दीत जाणे आणि कोरोणा सुरू झाल्यानंतर प्रवास करणे खूप धोकादायक वाटू लागले होते. यावर मी जॉब सोडणे हाच पर्याय निवडला.२ २ मार्च २०२० ( जनता करफ्यू) हा दिवस कोणी ही सहसा विसरू शकणार नाही. कारण २०२० मध्ये जो कोरोना नावाचा खेळ रंगला होता. त्याची सुरुवात या दिवसापासून झाली होती. काही लोक विजयी होऊन परतले तर काही आपला जीव गमावून. विजयी लोकांमध्ये माझा ही समावेश होताच. आपण खेळांमध्ये चिटिंग करणारे अंपायर्स पाहिलेच असतील. खेळ कुठल्या संघाच्या दिशेने जाईल हे अंपायर च्या हातात असते. असच काहीतरी चित्र दिसून आलं जेव्हा जनतेला उत्तम दर्जाच्या रुग्णालयांची आणि रोजगाराची गरज होती. त्यावेळी घराच्या छतावर जाऊन भांडी वाजवा आणि दिवे लावा सांगण्या ऐवजी घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिला असता तर बरे झाले असते.ठीक आहे ती त्यांची संकल्पना असेल मार्च पासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत अनेक लोकांनी आपले जीव गमावले, त्यांच्या कुटुंबाचे काय??? कसे राहत असतील ते?? या गोष्टींची मला जास्त खंत वाटते.फक्त साधारण सर्दी असणे म्हणजेच कोव्हीड पॉसिटिव्ह आहे असे असते का?? बहुतांश लोकांनी तर मला कोरोना झाला आहे याच भीतीपोटी आपला जीव गमावला असावा. कित्येक वर्षे सुरू असलेली मुंबई लोकल ट्रेन या कोरोना काळात थांबली. विठू माउली ची वारी ही या राक्षस कोरोना मुळे रद्द करण्यात आली. सामान्य माणूस आपल्या घरात बसून होता. ट्रेन , बस , कंपन्या सर्वच बंद पडून होते. सफाई कामगार, आरोग्य सेवक आणि आपले रक्षक पोलिस हे कर्तव्य बजावत होते. कोरोना च्या या कठीण काळात सर्वांनी माणसातला देव पहिला. बॉलिवुड अभिनेता ‘ सोनू सूद’ याने पुढाकार घेऊन, मजदुर आणि विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्यामध्ये मोलाचं वाटा होता. यांच्याकडून प्रेरित होऊन अनेक लोकांनी गरजू लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली.त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या आणि या कठीण काळात मदतीचा हात पुढे केला.कोरोणाचा तांडव कित्येक महिने सुरूच होता. त्यानंतर न्यू नॉर्मल च्या नावाने सर्व हळु हळु सुरू व्हायला सुरुवात झाली. कोरोनाचा हा खेळ अजून किती दिवस चालेल हे कोणालाच माहित नाही. कोरोनाची लस यशस्वी होईल की नाही कोणालाच माहीत नाही. परंतु आपण आपली काळजी घेत राहू. मास्क आणि ‌सॅनिटायजर वापरू. नवीन वर्ष येत आहे. नवीन संकल्प करू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *